AI सहाय्यकाचा प्रभावी वापर करायचा असेल, तर “प्रॉम्प्ट” कसा द्यायचा हे शिकणं महत्त्वाचं आहे. प्रॉम्प्ट म्हणजे काय? आणि योग्यप्रकारे प्रॉम्प्ट कसा लिहायचा? चला, जाणून घेऊया! 🚀
प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही AI ला विचारलेला प्रश्न, सूचना किंवा आदेश. योग्य आणि स्पष्ट प्रश्न विचारल्यास, उत्तरे अधिक अचूक आणि उपयुक्त मिळतात.
❌ खराब प्रॉम्प्ट: “माझ्यासाठी कविता लिहा.”
✅ चांगला प्रॉम्प्ट: “संकटावर मात करण्याची प्रेरणा देणारी मराठी कविता चार ओळींमध्ये लिहा.”
✔️ अधिक अचूक आणि उपयुक्त माहिती मिळते
✔️ वेळेची बचत होते
✔️ AI कडून सखोल आणि गुणवत्तापूर्ण उत्तरे मिळतात
✔️ चुकीची किंवा संदर्भहीन उत्तरे येण्याची शक्यता कमी होते
जर प्रश्न धूसर असेल, तर उत्तर अनिश्चित येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जे शोधत आहात, ते स्पष्टपणे मांडा.
📌 “मराठीत 200 शब्दांत AI चे भविष्यातील परिणाम स्पष्ट करा.”
📌 “Python मध्ये लूप कसा काम करतो? उदाहरणासह स्पष्ट करा.
जर तुम्ही AI ला योग्य संदर्भ दिलात, तर उत्तर अधिक योग्य आणि समजण्यास सोपे मिळते.
📌 “मी शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांना AI शिकवत आहे. AI चे फायदे आणि तोटे सोप्या भाषेत स्पष्ट करा.”
📌 “मी एका IT कंपनीत काम करतो. मला Windows 11 मध्ये Endpoint Management सुधारण्यासाठी काही उपाय सुचवा.”‘
तुम्हाला यादी, निबंध, सारांश, टेबल, कोड, किंवा पॉइंट्स हवे आहेत का? हे स्पष्ट सांगितल्यास उत्तम उत्तर मिळते.
📌 “डेटा संरचनेसाठी Python मध्ये सूची आणि Tuple मधील फरक एका टेबलमध्ये दाखवा.”
📌 “AI चे फायदे आणि तोटे पॉइंट्समध्ये सांग.”
तुम्हाला तांत्रिक, फॉर्मल, कॅज्युअल, क्रिएटिव्ह, किंवा विनोदी शैलीत उत्तर हवे आहे का?
📌 “AI आणि भविष्यातील त्याच्या परिणामांवर मराठीत सोप्या भाषेत 200 शब्द लिहा.”
📌 “AI चे फायदे एका फॉर्मल रिपोर्टच्या शैलीत लिहा.”
📌 “मला सोशल मीडियावर टाकण्यासाठी AI बद्दल एक मजेशीर पोस्ट हवी आहे.”
ChatGPT अनेक भाषा समर्थित करतो. पण संमिश्र भाषा किंवा इंग्रजी ट्रान्सलिटरेशन (Marathi in English) टाळा, कारण त्याने उत्तर गोंधळलेले येऊ शकते.
📌 “AI आणि भविष्यातील त्याच्या परिणामांवर मराठीत माहिती द्या.”
📌 “Please explain the future of AI in simple English.”
AI ला एखाद्या भूमिकेतून उत्तर द्यायला सांगितल्यास अधिक चांगले आणि सुसंगत उत्तर मिळते.
📌 “तू एक अनुभवी डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ आहेस. छोट्या व्यवसायांसाठी सोपी जाहिरात रणनीती सुचव.”
📌 “तू एक इतिहास अभ्यासक आहेस. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सखोल माहिती दे.”
जर प्रश्न मोठा किंवा गुंतागुंतीचा असेल, तर तो विभागून विचारल्यास उत्तम उत्तर मिळते.
📌 “Python मध्ये वेब स्क्रॅपिंग शिकण्याचे सोपे टप्पे सांग.”
📌 “AI आणि मशीन लर्निंगमधील फरक समजून घेण्यासाठी पहिले मूलभूत संकल्पना समजावून सांग, नंतर तुलनात्मक माहिती दे.”
“तू एक अनुभवी डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ आहेस. मी एका छोट्या स्थानिक व्यवसायाचा मालक आहे आणि माझ्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री वाढवायची आहे. माझा मुख्य टार्गेट ऑडियन्स 20-40 वयोगटातील आहेत, जे सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
कृपया मला 5 प्रभावी डिजिटल मार्केटिंग रणनीती सुचवा, ज्या कमी बजेटमध्ये उपयोगी पडतील. उत्तर स्पष्ट पॉइंट्समध्ये दे आणि प्रत्येक स्टेपसाठी साधे उदाहरण दे .”
✅ स्पष्ट भूमिका (Role): डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ
✅ संदर्भ (Context): स्थानिक व्यवसाय आणि टार्गेट ऑडियन्स
✅ स्पष्ट सूचना (Clear Instructions): 5 मार्केटिंग रणनीती द्याव्यात
✅ उत्तराचे स्वरूप (Format): पॉइंट्स आणि उदाहरणांसह
योग्यप्रकारे प्रॉम्प्ट लिहा आणि ChatGPT कडून अधिक चांगली उत्तरे मिळवा!
उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड…
उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध…
दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो…
घरगुती दह्यापासून तयार होणारा श्रीखंड हा प्रत्येक घरातला खास पदार्थ आहे. मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत…
आज आपण बनवणार आहोत गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट कचोरी! बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार, ही…
गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…