शेंगुळे ही महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे, जी ग्रामीण भागात विशेषतः लोकप्रिय आहे. आज आपण आरोग्यदायी पर्याय म्हणून ज्वारीच्या पिठाने शेंगुळे बनवणार आहोत. ज्वारी पोषणमूल्यांनी समृद्ध असून फायबर आणि ग्लूटेन-फ्री असल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे. चला तर मग, ही पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी शिकूया.

साहित्य:
शेंगुळ्यांसाठी:
- ज्वारीचे पीठ – २ कप
- गव्हाचे पीठ – १/२ कप
- बेसन पीठ- १/२ कप
- मीठ – १/२ चमचा
- पाणी – आवश्यकतेनुसार
- ओवा
- तिखट
- लसूण पेस्ट
रस्सा साठी:
- तेल – २ टेबलस्पून
- मोहरी – १/२ चमचा
- जिरं – १/२ चमचा
- हिंग – १ चिमूट
- हळद – १/२ चमचा
- कढीपत्ता – ८-१० पाने
- लसूण पेस्ट – १ चमचा
- तिखट – १ चमचा
- गोडा मसाला / गरम मसाला – १ चमचा
- चवीनुसार मीठ
- पाणी – ३-४ कप
- कोथिंबीर – सजावटीसाठी
कृती:
१. शेंगुळे तयार करणे:
- एका भांड्यात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन आणि मीठ, ओवा, लसूण पेस्ट, थोडेसे तिखट(तिखट कमी टाकावे कारण रस्सामद्धे पण तिखट आहे) . त्यात थोडे थोडे कोमट पाणी घालून मऊसर आणि लवचिक पीठ मळा.
- १०-१५ मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून पीठ सेट होईल.
- आता हाताला थोडे तेल लावून पिठाचे लहान गोळे घ्या आणि दोन्ही हातांनी पिठाचे शेंगुळे वळा.
२. रस्सा तयार करणे:
- एका भांड्यात तेल गरम करून मोहरी आणि जिरे तडतडू द्या.
- त्यात हिंग, हळद, कढीपत्ता आणि लसूण पेस्ट घालून परता.
- तिखट, मीठ, गरम मसाला टाका, नंतर ३-४ कप पाणी घालून उकळी आणा.
- एका वाटीमद्धे थोडे तयार शेंगुळ्याचे पीठ घ्या त्यात थोडे पानी टाकून स्लरी बनवा व रस्सामध्ये टाका ज्यामुळे रस्सा थोडा घट्ट होईल.
- तयार रस्स्यात हळूहळू शेंगुळे घाला आणि मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्या.
- शेंगुळे मऊ झाले की त्यावर कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.
शेंगुळे ही केवळ एक डिश नसून महाराष्ट्राच्या पारंपरिक चवीचा एक भाग आहे. ज्वारीच्या पिठाने बनवलेली ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला नक्की सांगा.