मराठी रेसिपीज (पाककृती)

साबुदाणा वडा

Sabudana Vada with Red and Green Chutney

साबुदाणा वडा हा महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट असा पारंपारिक पदार्थ आहे. उपवासाच्या काळात शरीराला ऊर्जा देणारा आणि तृप्त करणारा हा नाश्ता सर्वांचा खूप आवडता आहे. साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचे कूट  यांच्या मिश्रणातून तयार होणारा साबुदाणा वडा खूपच कुरकुरीत आणि स्वादिष्ट असतो. हा वडा दही किंवा हिरव्या मिरचीची चटणी आणि गोड काकडीची चटणी सोबत खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. चला तर, या पारंपारिक आणि रुचकर साबुदाणा वड्याची रेसिपी पाहूया.

साहित्य :

  1. साबुदाणा वडा साठी साहित्य –
    • साबुदाणा – 1 कप भिजवलेला
    • बटाटे – 2 उकडवून किसलेले
    • शेंगदाणे कूट – 1/2 कप
    • तिखट
    • मीठ
    • तेल
  2. गोड चटणी साठी साहित्य –
    • काकडी
    • साखर
    • मीठ
    • दही
  3. तिखट चटणी साठी साहित्य –
    • हिरवी मिरची
    • दही
    • मीठ

कृती

  1. शाबुदाना वडा कृती –
    • एका मोठ्या पातेल्यामध्ये भिजवलेला शाबुदाणा, उकडलेले बटाटे, शेंगदाणा कूट, तिखट आणि मीठ टाकून चांगला मिक्स करून घ्या.
    • त्या मिश्रणाचे लहान लहान गोळे तयार करून त्यांना वड्यांचा आकार द्या.
    • कढईमध्ये तेल गरम करून त्या मध्ये या वड्या टाका व दोन्ही साईडने चांगले सोनेरी व खुसखुशीत होयीपर्यंत तळून घ्या.
  2. गोड चटणी कृती –
    • एका पातेल्या मध्ये काकडी खिसून घ्या.
    • त्यामधे आत्ता दही, साखर आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
    • आपली गोड चटणी तयार आहे.
  3. तिखट चटणी कृती –
    • हिरवी मिरची वाटून घ्या.
    • त्यामधे दही व चवी नुसार मीठ टाकून मिक्स करा लागले तर थोडे पाणी टाका.

साबुदाणा वडे तयार झाले की त्यांच्या खुसखुशीतपणाचा आणि खास चवीचा आनंद घ्या. हा वडा फक्त उपवासासाठीच नव्हे, तर  स्नॅक म्हणूनही खूप लोकप्रिय आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा वडा आवडतो. सोपी कृती आणि कमी वेळेत तयार होणारा हा पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरातील एक आवडता पदार्थ नक्कीच बनेल. तर मग, साबुदाणा वडे बनवा आणि आपल्या परिवारासोबत या स्वादिष्ट वड्यांचा आस्वाद घ्या!

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड…

2 महिने ago

एगलेस मॅंगो केक

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध…

2 महिने ago

दही वडा रेसिपी | सोपी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये

दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो…

3 महिने ago

घरगुती श्रीखंड रेसिपी – पारंपरिक चव अगदी रेडीमेड श्रीखंडासारखी

घरगुती दह्यापासून तयार होणारा श्रीखंड हा प्रत्येक घरातला खास पदार्थ आहे. मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत…

4 महिने ago

खमंग आणि कुरकुरीत कचोरी

आज आपण बनवणार आहोत गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट कचोरी! बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार, ही…

4 महिने ago

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

4 महिने ago