मराठी रेसिपीज (पाककृती)

महाराष्ट्र स्पेशल – पुरण पोळी रेसीपी

पुरण पोळी हे महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि अत्यंत प्रिय असलेले गोड पदार्थ आहे. सणासुदीच्या दिवशी किंवा खास प्रसंगी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. गोड पुरण आणि मऊ पोळी यांचा मिलाप म्हणजे एक अद्वितीय चविष्ठ अनुभव. या रेसिपीत आपण पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत.

साहित्य :

  1. पुरणा साठी –
    • चना डाळ – 1 कप
    • गूळ – 1 कप
    • वेलची पूड – 1/2टिस्पून
    • तूप – 1 टिस्पून
  2. पोळी साठी –
    • गव्हाचे पीठ – 1 कप
    • तांदळाचे पीठ – 1/4 कप
    • मीठ – चवीनुसार
    • पाणी

कृती :

  1. पुरण बनविण्यासाठी –
    • चना डाळ धुवून 2 तास पाण्यात भिजवा.
    • नंतर डाळीचे पाणी काढून टाका आणि कुकरमध्ये डाळ २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत मिडीयम आचेवर शिजवा.
    • शिजलेली डाळ गाळून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
    • कढईत तूप गरम करून त्यात गूळ टाका आणि तो वितळवा.
    • गूळ वितळल्यावर त्यात वाटलेली डाळ घालून व्यवस्थित ढवळा.
    • मिश्रण घट्ट होत आल्यावर त्यात वेलची पूड घाला आणि चांगले एकत्र करा.
    • पुरण तयार झाले की ते गार होण्यासाठी बाजूला ठेवा.
  2. पुरणपोळी –
    • एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, मीठ, आणि तेल घालून एकत्र करा.पाण्याने मळून नरम पीठ तयार करा. पीठाला १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
    • पीठाचे लहान गोळे करून त्यात पुरण भरा.
    • पुरण भरलेली गोळी हलक्या हाताने पोळी प्रमाणे लाटून घ्या.
    • तव्यावर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.
    • गरम गरम पुरण पोळी तूप किंवा आमटी सोबत सर्व्ह करा.

पुरण पोळी ही महाराष्ट्रात घराघरात केले जाणारे एक खास पक्वान्न आहे, ज्याचा स्वाद घेतल्यावर प्रत्येकवेळी घराची आठवण येते. ही पारंपरिक रेसिपी आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी बनवा आणि त्यांच्याबरोबर या गोड क्षणांचा आनंद लुटा.

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

3 आठवडे ago

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा…

3 आठवडे ago

गुढीपाडवा शुभेच्छा आणि कॅप्शन्स – मराठी नव वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून, तो महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या…

4 आठवडे ago

गुढीपाडवा: हिंदू नववर्षाचे स्वागत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या…

4 आठवडे ago

फक्त १३ DNS सर्व्हर्स! संपूर्ण इंटरनेटचा पाया कसा उभा आहे?

कधी असा विचार केला आहे का, Google.com टाईप केल्यावर ब्राउझरला ते कसं समजतं? हे सगळं…

4 आठवडे ago

IP Address Explained: नेटवर्किंगच्या जगातले आधारस्तंभ!

कल्पना करा, तुम्ही एखाद्या घराला पोस्टाने पत्र पाठवताय, पण त्या घराचा पत्ता माहित नसेल तर?…

4 आठवडे ago