
पुरण पोळी हे महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि अत्यंत प्रिय असलेले गोड पदार्थ आहे. सणासुदीच्या दिवशी किंवा खास प्रसंगी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. गोड पुरण आणि मऊ पोळी यांचा मिलाप म्हणजे एक अद्वितीय चविष्ठ अनुभव. या रेसिपीत आपण पुरण पोळी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत.
साहित्य :
- पुरणा साठी –
- चना डाळ – 1 कप
- गूळ – 1 कप
- वेलची पूड – 1/2टिस्पून
- तूप – 1 टिस्पून
- पोळी साठी –
- गव्हाचे पीठ – 1 कप
- तांदळाचे पीठ – 1/4 कप
- मीठ – चवीनुसार
- पाणी
कृती :
- पुरण बनविण्यासाठी –
- चना डाळ धुवून 2 तास पाण्यात भिजवा.
- नंतर डाळीचे पाणी काढून टाका आणि कुकरमध्ये डाळ २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत मिडीयम आचेवर शिजवा.
- शिजलेली डाळ गाळून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- कढईत तूप गरम करून त्यात गूळ टाका आणि तो वितळवा.
- गूळ वितळल्यावर त्यात वाटलेली डाळ घालून व्यवस्थित ढवळा.
- मिश्रण घट्ट होत आल्यावर त्यात वेलची पूड घाला आणि चांगले एकत्र करा.
- पुरण तयार झाले की ते गार होण्यासाठी बाजूला ठेवा.
- पुरणपोळी –
- एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, मीठ, आणि तेल घालून एकत्र करा.पाण्याने मळून नरम पीठ तयार करा. पीठाला १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
- पीठाचे लहान गोळे करून त्यात पुरण भरा.
- पुरण भरलेली गोळी हलक्या हाताने पोळी प्रमाणे लाटून घ्या.
- तव्यावर गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.
- गरम गरम पुरण पोळी तूप किंवा आमटी सोबत सर्व्ह करा.
पुरण पोळी ही महाराष्ट्रात घराघरात केले जाणारे एक खास पक्वान्न आहे, ज्याचा स्वाद घेतल्यावर प्रत्येकवेळी घराची आठवण येते. ही पारंपरिक रेसिपी आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी बनवा आणि त्यांच्याबरोबर या गोड क्षणांचा आनंद लुटा.