परफेक्ट इडली रेसिपी – मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

साऊथ इंडियन फूड म्हणल की आठवते इडली. हलकी, मऊ आणि पचायला सोपी असल्यामुळे इडली नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चटणी आणि सांबारसोबत तिची चव आणखी खुलते. चला तर मग परफेक्ट फर्मेंटेड इडली कशी बनवायची ते पाहूया.

साहित्य :

  • २ कप तांदूळ
  • १ कप उडीद डाळ
  • १ टीस्पून मेथी दाणे
  • १ टीस्पून मीठ
  • पाणी (गरजेनुसार)
  • तेल (इडली साचा ग्रीस करण्यासाठी)

कृती :

१. तांदूळ आणि डाळ भिजवणे:
  • तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात धुऊन घ्या.
  • उडीद डाळीत मेथी दाणे टाकून ५-६ तास भिजू द्या.
  • तांदूळ देखील साधारण ५-६ तास भिजू द्या.
२. पीठ तयार करणे:
  • उडीद डाळ एकत्र करून बारीक वाटून घ्या. मिश्रण हलके फुगले पाहिजे.
  • तांदूळ थोडे भरडसर वाटून घ्या.
  • दोन्ही मिश्रण एकत्र करून त्यात मीठ घाला.
  • हे मिश्रण उबदार जागी ८-१० तास (रात्रभर) झाकून ठेवा, जेणेकरून ते व्यवस्थित आंबेल.
३. इडली वाफवणे:
  • इडली पात्राला तेल लावून त्यात तयार पीठ ओता.
  • कुकर किंवा इडली स्टिमरमध्ये पाणी गरम करून, साचा आत ठेवा.
  • झाकण लावून १०-१२ मिनिटे वाफवा. (कुकरमध्ये शिट्टी न लावता किंवा इडली पात्रा मध्ये)
  • चमच्याने टोचून पाहा, जर पीठ चिकटले नाही तर इडली तयार आहे.
  • गरमागरम इडलीला खोबऱ्याच्या चटणी आणि मसाला सांबारसोबत सर्व्ह करा.

टीप :

  • अधिक मऊ इडलीसाठी उडीद डाळ व्यवस्थित वाटा आणि पीठ चांगले आंबू द्या.
  • रवा इडलीसाठी तांदळाऐवजी बारीक रवा वापरू शकता.

इडली तयार झाली की, तिची चव आणखी खुलवण्यासाठी मसाला सांबारसोबत सर्व्ह करा, परफेक्ट सांबार रेसिपीसाठी ही लिंक पाहा! 🍛🔥 तुमचा फीडबॅक आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि नवीन रेसिपींसाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या!

Sayali Kekarjawalekar
Sayali Kekarjawalekar
Articles: 39

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत