रेसिपीज (पाककृती)

स्ट्रीट फूड – पावभाजी

पाव भाजी ही एक लोकप्रिय भारतीय डिश आहे जी मुंबईच्या स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे. ती बनवणे सोपे आहे आणि चवीला खूपच सुंदर आहे.

Pav Bhaji
Street Food – Pav Bhaji

साहित्य :

  1. कांदा – २ (१ मिक्सर मधून पेस्ट केलाला, १ बारीक चिरलेला)
  2. टोमॅटो – ३ (१ मिक्सर मध्ये पेस्ट केलेला, २ बारीक चिरलेले)
  3. हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेली)
  4. गाजर – ½ कप
  5. बटाटे – २ उकडून स्मॅश करून घ्या
  6. वाटाणे
  7. आले लसूण पेस्ट – १ चमचा
  8. धने पूड – १ चमचा
  9. हळद – ½ चमचा
  10. लाल तिखट – १ चमचा
  11. पावभाजी मसाला – १ चमचा
  12. तेल –  २ टेबलस्पून
  13. बटर -½ चमचा
  14. कोथिंबीर
  15. मीठ – चवीप्रमाणे
  16. पाव
  17. चीझ

कृती :

  1. एका मोठ्या कढईमध्ये तेल आणि तूप गरम करा. त्यात मिक्सर पेस्ट काढलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या.
  2. टोमॅटो पेस्ट, आले-लसूण पेस्ट, धणेपूड, वाटाणे, गाजर, लाल तिखट आणि पाव भाजी मसाला घाला आणि मसाले  २ मिनिटे परतून घ्या.
  3. त्यामध्ये १ वाटी पाणी टाका.
  4. स्मॅश केलेले बटाटे, हळद आणि मीठ घालुन चांगले मिक्स करून घ्या.
  5. भाजी झाकून ठेवून मऊ होयीपर्यंत शिजवून घ्या.
  6. भाजीवर चिरलेले कोथिंबीर, टोमॅटो, कांदा व चीझ टाकून डेकोरेट करा व भाजलेल्या पावसोबत गरम गरम सर्व्ह करा.

टिप्स:

  1. आपल्या आवडीनुसार पाव तुपामध्ये / बटरमध्ये भाजून घेऊ शकता.
  2. आपल्या आवडीनुसार भाजी मध्ये फुलगोबी, वांगी, ब्रोकली, पनीर बारीक करून टाकू शकता

ही पावभाजी तुमच्या घरातील सर्वांना नक्कीच आवडेल. अधिक स्वादिष्ट रेसिपीसाठी आमच्या ब्लॉगला भेट देत राहा.

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

संघर्षाची वाटचाल – रवीच्या जिद्दीने लिहिलेली यशाची कहाणी

ही गोष्ट आहे रवी नावाच्या एका तरुणाची, जो एका मध्यमवर्गीय घरात वाढला होता. रवीची स्वप्नं…

3 महिने ago

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा हा महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट असा पारंपारिक पदार्थ…

3 महिने ago

फ्रेंच फ्राईज 🍟

फ्रेंच फ्राईज हा एक लोकप्रिय आणि चविष्ट स्नॅक आहे जो जगभरात आवडीने खाल्ला जातो. कुरकुरीत…

5 महिने ago

चीझ वडापाव

वडापाव हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळेला खाता येतो. सकाळच्या न्याहारीपासून ते संध्याकाळच्या…

6 महिने ago

पोटॅटो चीझ नगेट्स

पोटॅटो चीज नगेट्स हा एक लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा  पदार्थ आहे. पोटॅटो…

6 महिने ago

घरच्या घरी बनवा मलाईदार लस्सी फक्त 10 मिनिटांत

वाढत्या तापमानामुळे असह्य वाटतेय का? तर मग आज घेवून आलोय तुमच्यासाठी खास पंजाबची प्रसिद्ध लस्सी…

7 महिने ago