मराठी रेसिपीज (पाककृती)

पुणेरी स्पेशल – मिसळ पाव रेसीपी

Misal Pav

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी- पुणे, आपल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याच्या रस्त्यांवर फिरताना तुमचं मन नक्कीच मिसळ पावने खेचून घेतं! मिसळ पाव हा पुण्याचाच काय पूर्ण महाराष्ट्रियन लोकांचा अत्यंत लोकप्रिय आणि खास नाश्ता आहे, मसालेदार रस्सा, चविष्ट उसळ, कुरकुरीत फरसाण आणि मऊ पाव चला, तर मग एक चवदार पुणे-स्टाइल मिसळ बनवूया!

साहित्य :

  1. उसळीसाठी :
    • मटकी – 1 कप मोड आलेली
    • कांदा – 1 बारीक चिरून
    • टोमॅटो – 1 बारीक चिरलेले
    • आले लसूण पेस्ट – 1 चमचा
    • लाल तिखट – चवीनुसार
    • हळद – 1/2 चमचा
    • गरम मसाला – 1 चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • धने जिरा पाऊडर – 1 चमचा
    • तेल – 2 चमचे
  2. रस्सा साठी –
    • कांदा – बारीक चिरलेला
    • टोमॅटो – 1 बारीक चिरलेले
    • लाल तिखट – चवीनुसार
    • तेल – 2 चमचे
    • मीठ – चवीनुसार
    • खसखस – 1 चमचा
    • खोबरे – 1 चमचा सुके
    • मिसळ मसाला – 1 चमचा

कृती :

  1. उसळ :
    • कुकर मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या.
    • त्यात आले लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
    • नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
    • हळद, तिखट, धने पाऊडर आणि गरम मसाला टाका.
    • कुकरचे 2 -3 शिट्टी काढा व तयार ठेवा.
  2. रस्सा :
    • कढई मध्ये तेल गरम करून कांदा परतून घ्या.
    • त्यात खोबरे, खसखस, टोमॅटो घालून परता व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
    • परत तेल गरम करून वाटलेले मिश्रण टाका.
    • लाल तिखट , मिसळ मसाला व मीठ टाकून 2 कप पानी घालून 10 मिनीट उकळव.

एका खोल वाटीत उसळ टाका. त्यावर गरम रस्सा टाका व चिरलेले कांदा, कोथिंबीर आणि फारसं टाकून गरमागरम पावासोबत सर्व करा.

  • टीप :
    • कोल्हापुरी मिसळसाठी रस्सा अधिक तिखट कर

मिसळ पाव ही एक अशी रेसिपी आहे जी तुमच्या घराच्या प्रत्येक सदस्याच्या आवडीनुसार साधी किंवा तिखट बनवता येईल. ती तुमचं तिखट आणि चवदार नाश्ता म्हणून किंवा जेवण म्हणून हवी असेल तेव्हा उत्तम आहे. चवदार, मसालेदार आणि पौष्टिक, ही रेसिपी एक अनोखी स्वादिष्ट भेट आहे. या रेसिपीला तुमच्या कुटुंबासोबत अजून मजेदार बनवा!

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

3 आठवडे ago

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा…

4 आठवडे ago

गुढीपाडवा शुभेच्छा आणि कॅप्शन्स – मराठी नव वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून, तो महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या…

4 आठवडे ago

गुढीपाडवा: हिंदू नववर्षाचे स्वागत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या…

4 आठवडे ago

फक्त १३ DNS सर्व्हर्स! संपूर्ण इंटरनेटचा पाया कसा उभा आहे?

कधी असा विचार केला आहे का, Google.com टाईप केल्यावर ब्राउझरला ते कसं समजतं? हे सगळं…

4 आठवडे ago

IP Address Explained: नेटवर्किंगच्या जगातले आधारस्तंभ!

कल्पना करा, तुम्ही एखाद्या घराला पोस्टाने पत्र पाठवताय, पण त्या घराचा पत्ता माहित नसेल तर?…

4 आठवडे ago