
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी- पुणे, आपल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याच्या रस्त्यांवर फिरताना तुमचं मन नक्कीच मिसळ पावने खेचून घेतं! मिसळ पाव हा पुण्याचाच काय पूर्ण महाराष्ट्रियन लोकांचा अत्यंत लोकप्रिय आणि खास नाश्ता आहे, मसालेदार रस्सा, चविष्ट उसळ, कुरकुरीत फरसाण आणि मऊ पाव चला, तर मग एक चवदार पुणे-स्टाइल मिसळ बनवूया!
साहित्य :
- उसळीसाठी :
- मटकी – 1 कप मोड आलेली
- कांदा – 1 बारीक चिरून
- टोमॅटो – 1 बारीक चिरलेले
- आले लसूण पेस्ट – 1 चमचा
- लाल तिखट – चवीनुसार
- हळद – 1/2 चमचा
- गरम मसाला – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
- धने जिरा पाऊडर – 1 चमचा
- तेल – 2 चमचे
- रस्सा साठी –
- कांदा – बारीक चिरलेला
- टोमॅटो – 1 बारीक चिरलेले
- लाल तिखट – चवीनुसार
- तेल – 2 चमचे
- मीठ – चवीनुसार
- खसखस – 1 चमचा
- खोबरे – 1 चमचा सुके
- मिसळ मसाला – 1 चमचा
कृती :
- उसळ :
- कुकर मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या.
- त्यात आले लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
- नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
- हळद, तिखट, धने पाऊडर आणि गरम मसाला टाका.
- कुकरचे 2 -3 शिट्टी काढा व तयार ठेवा.
- रस्सा :
- कढई मध्ये तेल गरम करून कांदा परतून घ्या.
- त्यात खोबरे, खसखस, टोमॅटो घालून परता व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- परत तेल गरम करून वाटलेले मिश्रण टाका.
- लाल तिखट , मिसळ मसाला व मीठ टाकून 2 कप पानी घालून 10 मिनीट उकळव.
एका खोल वाटीत उसळ टाका. त्यावर गरम रस्सा टाका व चिरलेले कांदा, कोथिंबीर आणि फारसं टाकून गरमागरम पावासोबत सर्व करा.
- टीप :
- कोल्हापुरी मिसळसाठी रस्सा अधिक तिखट कर
मिसळ पाव ही एक अशी रेसिपी आहे जी तुमच्या घराच्या प्रत्येक सदस्याच्या आवडीनुसार साधी किंवा तिखट बनवता येईल. ती तुमचं तिखट आणि चवदार नाश्ता म्हणून किंवा जेवण म्हणून हवी असेल तेव्हा उत्तम आहे. चवदार, मसालेदार आणि पौष्टिक, ही रेसिपी एक अनोखी स्वादिष्ट भेट आहे. या रेसिपीला तुमच्या कुटुंबासोबत अजून मजेदार बनवा!