मराठी रेसिपीज (पाककृती)

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड स्वाद अनुभवण्यासाठी एका खास कुल्फीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ही मॅंगो स्टफ्ड कुल्फी बनवायला सोपी आणि जलद आहे, आणि त्यात आंब्याचा गोड स्वाद एकत्रित झाला आहे. चला, मग आंब्याच्या कुल्फीची रेसिपी पाहूया.

Mango Stuffed Kulfi
Mango Stuffed Kulfi

साहित्य :

  • २ मध्यम आकाराचे आंबे
  • ½ कप साखर (चवीनुसार)
  • ½ कप कंडेन्स्ड मिल्क
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स (काजू, बदाम, पिस्ता, चेरी)

कृती :

  • आंब्याची वरची थोडी साइड काढून घ्या.
  • यातील कोय हळुवारपणे हाताने कडून घ्या.
  • हे आंबे फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवून द्या.
  • कोईमधील गर काढून घ्या, व मिक्सर वर फिरवा.
  • एक कढईमध्ये दूध अर्धे होईपर्यंत आटवून घ्या.
  • आटवलेल्या दूधामद्धे साखर, कंडेन्स्ड मिल्क आणि व्हॅनिला इसेन्स, ड्रायफ्रुट्स टाकून उकळवून घ्या.
  • तयार केलेले आइस्क्रीम मिश्रण थंड आंब्याच्या आत भरून घ्या.
  • वरून पुन्हा आंब्याचं झाकण लावा.
  • हे भरलेले आंबे एका कंटेनरमध्ये उभे ठेवा.
  • फ्रीजरमध्ये किमान ८-१० तास ठेवा.
  • आंबे बाहेर काढा आणि ५ मिनिटं थंडीतून बाहेर ठेवा. त्याचे २-३ वडीसारखे तुकडे कापा.
  • वरून ड्रायफ्रुट्सने सजवा आणि लगेच सर्व्ह करा!

उन्हाळ्याच्या या खास सिझनमध्ये, ही मॅंगो स्टफ्ड कुल्फी नक्की करून पाहा. ही मॅंगो स्टफ्ड आइस्क्रीम केवळ गोड नाही, तर पाहायलाही इतकी सुंदर आहे की, तिचे फोटोज आपल्या इंस्टा फीडला चमकवतील.

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

एगलेस मॅंगो केक

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध…

2 आठवडे ago

दही वडा रेसिपी | सोपी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये

दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो…

1 महिना ago

खमंग आणि कुरकुरीत कचोरी

आज आपण बनवणार आहोत गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट कचोरी! बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार, ही…

2 महिने ago

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

2 महिने ago

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा…

2 महिने ago

गुढीपाडवा शुभेच्छा आणि कॅप्शन्स – मराठी नव वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून, तो महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या…

2 महिने ago