दिवाळी असो कि कोणताही सन किंवा खास प्रसंग असो, गोड पदार्थाशिवाय तो अपूर्ण वाटतो. आणि काजू कतली म्हणजे अशी मिठाई, जी सगळ्यांनाच आवडते. आज आपण बाजारातील कतलीपेक्षा चविष्ट आणि मऊ काजू कतली केवळ ३ घटकांमध्ये तयार होणारी मऊ, स्वादिष्ट काजू कतली फक्त १५ मिनिटांत तयार करा.

साहित्य:
- १ कप (२०० ग्रॅम) काजू
- १/२ कप (१०० ग्रॅम) साखर
- १/४ कप पाणी
- १ चमचाभर तूप (ग्रीसिंगसाठी)
- चांदीचा वर्ख (ऑप्शनल)
- वेलची पूड
बनवण्याची पद्धत:
१. काजूचं पीठ तयार करा
- काजू पूर्णपणे कोरडे असावेत. ओलसर काजू असल्यास त्यांना काही तास वाळवून घ्या.
- मिक्सरमध्ये काजू बारीक पावडरसारखे वाटून घ्या. लक्षात ठेवा, जास्त वेळ वाटल्यास काजू तेल सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडेसे वाटून घ्या.
२. साखरेची पाक (सिरप)
- एका नॉन-स्टिक पॅनमध्ये साखर आणि १/४ कप पाणी टाका.
- साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मध्यम आचेवर गरम करा.
- एकतारी पाक तयार झाला की त्यात वाटलेले काजू पावडर टाका आणि मंद आचेवर सतत हलवत राहा.
३. मिश्रण घट्ट करा
- मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात वेलची पूड घाला आणि मंद आचेवर २-३ मिनिटं हलवत राहा.
- मिश्रण पॅनच्या कडेला चिकटत असेल, तर समजून घ्या की ते तयार होत आहे.
- तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून, थोडेसे थंड होऊ द्या.
४. परफेक्ट काजू कतली कापणे
- मिश्रण कोमट झाल्यावर त्यावर तूप लावलेला लाटण फिरवून पातळ लाटून घ्या.
- आपल्या पसंतीनुसार हिरेसारख्या आकारात कापून घ्या.
- चांदीचा वर्ख लावून सजवा.
महत्त्वाचे टीप्स:
- काजू फार वेळ वाटू नका.
- मिश्रण जास्त घट्ट करू नका, नाहीतर कतली कडक बनेल.
- साखरेचा एकतारी पाक तयार करणे महत्त्वाचे आहे, त्यामुळेच कतली मऊ आणि परफेक्ट बनते.
घरच्या घरी झटपट आणि स्वादिष्ट काजू कतली बनवण्यासाठी ही रेसिपी वापरून बघा आणि आनंद घ्या! नवीन रेसिपींसाठी आमच्या ब्लॉगवर पुन्हा भेट द्या आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा.