इटालियन रेसिपी – रेड सॉस पास्ता

आज आपण एक स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी शिकणार आहोत जी आपण घरी बनवू शकता. पास्ता हा एक इटालियन पदार्थ आहे जो जगभरात लोकप्रिय आहे. फक्त काही घटकांसह, आपण स्वादिष्ट पास्ता तयार करू शकता.

Red Sauce Pasta
Red Sauce Pasta

साहित्य :

  1. पास्ता – १०० ग्रॅम
  2. तेल – २ चमचे
  3. टोमॅटो – २ बारीक चिरून
  4. कांदा – १ चिरलेला
  5. लसूण – ३ – ४ पाकळ्या वाटून घेतलेल्या
  6. मॅगी पास्ता मसाला – १ पॅकेट
  7. रेड चिली सॉस – २ टेबलस्पून
  8. सोया सॉस – १ टेबलस्पून
  9. टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
  10. मीठ- चवीनुसार
  11. चीझ

कृती :

  1. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून घ्या. त्यात 1 चमचा मीठ आणि थोडे तेल टाकून पास्ता घाला व 15 मिनिटे पास्ता शिजवून घ्या.
  2. नंतर पास्ता बाजूला काढून थोडे तेल लावून ठेवा ज्यामुळे तो एकमेकाला चिटकवून बसणार नाही.
  3. नंतर एका पॅन मध्ये तेल टाकून मध्यम आचेवर गरम करून घ्या व त्यामधे कांदा घालून परतून घ्या
  4. कांदा चांगला परतल्यावर त्यामधे वाटलेला लसूण व टोमॅटो टाकून मऊ होई पर्यंत परतून घ्या.
  5. नंतर त्यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस टाकून 1 मिनिट परतून घ्या.
  6. आता त्यामध्ये पास्ता टाकून पास्ता मसाला मिक्स करा व चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
  7. 5 मिनिट पास्ता मध्यम आचेवर ठेवा.
  8. ग्रेटेड चीझ ने डेकोरेट करून गरम गरम सर्व्ह करा.
Sayali Kekarjawalekar
Sayali Kekarjawalekar
Articles: 12

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत