घरगुती दह्यापासून तयार होणारा श्रीखंड हा प्रत्येक घरातला खास पदार्थ आहे. मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच श्रीखंड आवडते. आज आपण बघणार आहोत एकदम सोपी, पण चविष्ट अशी श्रीखंड रेसिपी.
ही रेसिपी खास आहे कारण तुम्ही ते तयार करणार आहात घरच्या घरी आणि अगदी “रेडीमेड श्रीखंडासारखं” चला तर मग सुरू करूया.

साहित्य :
साहित्य | प्रमाण |
---|---|
दही | 2 वाटी |
पिठीसाखर | 3/4 कप (चवीनुसार) |
वेलची पूड | 1/2 टीस्पून |
केशर | दुधात भिजवलेले |
बदाम-पिस्ता | सजावटीसाठी (कापलेले) |
कृती :
1. चक्का दही तयार करणे :
- एका स्वच्छ सूती कापडात दही घाला.
- त्याला एका चाळणीवर ठेवा आणि त्यावर वजन ठेवा जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल.
- 5-6 तास फ्रीजमध्ये ठेवा.
- सूती कपड्यामद्धे दही बांधल्यास चक्का आंबट होत नाही.
2. श्रीखंड तयार करणे
- तयार झालेल्या चक्का दहयात पिठीसाखर घालून चांगले फेटून घ्या.
- केशर दूध, वेलची पूड घालून पुन्हा मिक्स करून घ्या.
- हे मिश्रण अगदी मऊ होईपर्यंत फेटत रहा.
3. सजावट व सादरीकरण
- वरून बदाम-पिस्ता टाका आणि थोडंसं केशरही.
- थंडगार श्रीखंड फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवून सर्व्ह करा.
टीप्स
- चवीनुसार साखरेचं प्रमाण वाढवा किंवा कमी करा.
- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्ड श्रीखंड सुद्धा बनवू शकता जसे की – मँगो फ्लेवर – आंब्याचा रस टाकून बनवू शकता.
- मनुके घालू नका यामुळे श्रीखंडाची मूळ चव लागत नाही.
गोड खाण्याची खरी मजा तेव्हा येते, जेव्हा ते स्वतः बनवलेलं असतं! जर तुम्ही ही श्रीखंड रेसिपी ट्राय केली असेल, तर तुमचा अनुभव आणि फोटो आमच्यासोबत शेअर करा. आणखी अशाच मराठमोळ्या आणि झटपट रेसिपीसाठी माझा ब्लॉग फॉलो करायला विसरू नका.