मराठी रेसिपीज (पाककृती)

साऊथ इंडियन स्टाईल दोसा

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम, कुरकुरीत दोसा आणि चविष्ट सांबार! दोसा फक्त दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. नाश्ता असो वा संध्याकाळचा स्नॅक, दोसा आणि सांबार हे नेहमीच स्वादिष्ट आणि पचायला हलके पर्याय असतात. आज आपण पारंपरिक पद्धतीने दोसा कसे बनवायचा ते पाहणार आहोत.


साहित्य:

  • २ कप तांदूळ
  • १ कप उडीद डाळ
  • १/२ टीस्पून मेथी दाणे
  • १/२ कप पोहे (पर्यायी)
  • मीठ चवीनुसार
  • पाणी गरजेप्रमाणे
  • तेल किंवा लोणी
  • तवा (लोखंडी किंवा नॉन-स्टिक)

कृती:

  1. तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात ५-६ तास भिजवून ठेवा. मेथी दाणे तांदळासोबत भिजवा.
  2. भिजवलेले तांदूळ, डाळ आणि मेथी दाणे मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्या. पोहे देखील मिक्सरमध्ये वाटून घ्या, यामुळे दोसा छान टेक्सचर येईल.
  3. तयार मिश्रण एका भांड्यात काढा, मीठ घाला आणि ८-१० तास झाकून ठेवा, म्हणजे ते चांगलं आंबेल.
  4. तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यावर मिठाच्या पाण्याचे शिंतोडे मारा ज्यामुळे दोसा तव्याला चिटकणार नाही.
  5. पीठ व्यवस्थित हलवून एक लहान चमचा पीठ तव्यावर टाका आणि गोलसर हलक्या हाताने पसरवा.
  6. थोडंसं तेल किंवा लोणी टाका आणि दोसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.
  7. दोसा हलक्या हाताने उलटून दुसऱ्या बाजूनेही थोडा वेळ शिजवा.
  8. तुमचा कुरकुरीत आणि स्वादिष्ट दोसा तयार.
  9. तयार दोसा सांबर, नारळ चटणी, टोमॅटो चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.

टीप्स:

  • तवा गरम झाला की गॅस मध्यम करा, नाहीतर दोसा चिकटेल.
  • दोसा अधिक कुरकुरीत हवा असेल तर पीठ आंबल्यानंतर थोडंसं रवा घाला.
  • लोखंडी तवा वापरत असाल तर आधी त्याला चांगलं तेल लावा आणि मग दोसा टाका.
  • परफेक्ट सांबार साठी ही खास रेसिपी पाहा

हॉटेलसारखा परफेक्ट दोसा घरी बनवून पाहा आणि तुमचा अनुभव शेअर करा. आणखी चविष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी आम्हाला फॉलो करा

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड…

2 महिने ago

एगलेस मॅंगो केक

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध…

2 महिने ago

दही वडा रेसिपी | सोपी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये

दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो…

2 महिने ago

घरगुती श्रीखंड रेसिपी – पारंपरिक चव अगदी रेडीमेड श्रीखंडासारखी

घरगुती दह्यापासून तयार होणारा श्रीखंड हा प्रत्येक घरातला खास पदार्थ आहे. मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत…

3 महिने ago

खमंग आणि कुरकुरीत कचोरी

आज आपण बनवणार आहोत गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट कचोरी! बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार, ही…

3 महिने ago

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

3 महिने ago