दक्षिण भारतीय पदार्थ म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम, कुरकुरीत दोसा आणि चविष्ट सांबार! दोसा फक्त दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. नाश्ता असो वा संध्याकाळचा स्नॅक, दोसा आणि सांबार हे नेहमीच स्वादिष्ट आणि पचायला हलके पर्याय असतात. आज आपण पारंपरिक पद्धतीने दोसा कसे बनवायचा ते पाहणार आहोत.

साहित्य:
- २ कप तांदूळ
- १ कप उडीद डाळ
- १/२ टीस्पून मेथी दाणे
- १/२ कप पोहे (पर्यायी)
- मीठ चवीनुसार
- पाणी गरजेप्रमाणे
- तेल किंवा लोणी
- तवा (लोखंडी किंवा नॉन-स्टिक)
कृती:
- तांदूळ आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात ५-६ तास भिजवून ठेवा. मेथी दाणे तांदळासोबत भिजवा.
- भिजवलेले तांदूळ, डाळ आणि मेथी दाणे मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्या. पोहे देखील मिक्सरमध्ये वाटून घ्या, यामुळे दोसा छान टेक्सचर येईल.
- तयार मिश्रण एका भांड्यात काढा, मीठ घाला आणि ८-१० तास झाकून ठेवा, म्हणजे ते चांगलं आंबेल.
- तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यावर मिठाच्या पाण्याचे शिंतोडे मारा ज्यामुळे दोसा तव्याला चिटकणार नाही.
- पीठ व्यवस्थित हलवून एक लहान चमचा पीठ तव्यावर टाका आणि गोलसर हलक्या हाताने पसरवा.
- थोडंसं तेल किंवा लोणी टाका आणि दोसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.
- दोसा हलक्या हाताने उलटून दुसऱ्या बाजूनेही थोडा वेळ शिजवा.
- तुमचा कुरकुरीत आणि स्वादिष्ट दोसा तयार.
- तयार दोसा सांबर, नारळ चटणी, टोमॅटो चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
टीप्स:
- तवा गरम झाला की गॅस मध्यम करा, नाहीतर दोसा चिकटेल.
- दोसा अधिक कुरकुरीत हवा असेल तर पीठ आंबल्यानंतर थोडंसं रवा घाला.
- लोखंडी तवा वापरत असाल तर आधी त्याला चांगलं तेल लावा आणि मग दोसा टाका.
- परफेक्ट सांबार साठी ही खास रेसिपी पाहा
हॉटेलसारखा परफेक्ट दोसा घरी बनवून पाहा आणि तुमचा अनुभव शेअर करा. आणखी चविष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी आम्हाला फॉलो करा