मराठी रेसिपीज (पाककृती)

दही वडा रेसिपी | सोपी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये

दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो मऊसर वडे, गोडसर दही, तिखट मसाले आणि चटण्यांचा मेळ – ही चव एकदा अनुभवली की पुन्हा पुन्हा आठवते. चला तर मग, आज दही वड्याच्या ह्या परफेक्ट रेसिपीला आधुनिक पद्धतीने बनवूया.

dahi-vada

साहित्याची यादी (४ जणांसाठी):

  • उडीद डाळ – १ कप (रात्री भिजवलेली)
  • हिरवी मिरची – २
  • आलं – १ छोटा तुकडा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी
  • दही – २ कप (गार आणि फेटलेलं)
  • साखर – २ चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • झणझणीत लाल तिखट
  • काळं मीठ
  • जिरे पूड (भाजलेली)
  • गोड चिंचगुळाची चटणी
  • हिरवी चटणी (कोथिंबीर, मिरची, लसुण)
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • थोडं बारीक शेव (ऑप्शनल)

कृती :

  1. उडीद डाळ चांगली धुवून ६-७ तास भिजवून ठेवा.
  2. भिजलेली डाळ हिरव्या मिरच्या, आलं आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या.
  3. हे मिश्रण एका भांड्यात काढून त्याला हलक्या हाताने फेटा, म्हणजे वडे हलके होतील.
  4. एका कढईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे गोळे टाकून वडे खरपूस तळून घ्या.
  5. तळलेले वडे गरम गरम पाण्यात १५ मिनिटं भिजवा. नंतर त्यांना हाताने हलकं दाबून पाणी काढून टाका.
  6. गार दही फेटून त्यात साखर आणि मीठ घाला.
  7. फेटलेलं दही एका ताटामद्धे पसरवा.
  8. त्यावर निथळलेले वडे नीट मांडून घ्या.
  9. वड्यांवर चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी घाला.
  10. त्यावर थोडं तिखट, जिरेपूड, काळं मीठ पसरवा.
  11. वरून थोडीशी कोथिंबीर आणि शेव शिंपडा.

टीप :

  • उडीद डाळ फेटणं खूप महत्त्वाचं आहे – त्यामुळे वडे हलके आणि मऊसर होतील.
  • दही नेहमी गार आणि गोडसरसर वापरावं – त्यामुळे टेस्ट उत्तम लागते.
  • चिंचगुळाची चटणी आधीच करून फ्रिजमध्ये ठेवली तर वेळ वाचतो.

जर ही रेसिपी आवडली असेल तर ती घरी करून बघा, फोटो क्लिक करा आणि आमच्यासोबत शेअर करा! तुमचा खास स्पर्श असलेली दही वडे प्लेट आम्हाला बघायला आवडेल. आणि हो, अशा अजून भन्नाट रेसिपीसाठी आम्हाला फॉलो करा

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

1 महिना ago

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा…

1 महिना ago

गुढीपाडवा शुभेच्छा आणि कॅप्शन्स – मराठी नव वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून, तो महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या…

1 महिना ago

गुढीपाडवा: हिंदू नववर्षाचे स्वागत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या…

1 महिना ago

फक्त १३ DNS सर्व्हर्स! संपूर्ण इंटरनेटचा पाया कसा उभा आहे?

कधी असा विचार केला आहे का, Google.com टाईप केल्यावर ब्राउझरला ते कसं समजतं? हे सगळं…

1 महिना ago

IP Address Explained: नेटवर्किंगच्या जगातले आधारस्तंभ!

कल्पना करा, तुम्ही एखाद्या घराला पोस्टाने पत्र पाठवताय, पण त्या घराचा पत्ता माहित नसेल तर?…

1 महिना ago