
आज आपण बिस्किटांपासून अगदी सोपा आणि झटपट चॉकलेट लावा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हा केक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त सामग्रीची किंवा वेळेची गरज नाही. घरात असलेल्या थोड्याश्या वस्तूंमधूनच तुम्ही अप्रतिम चवीचा लावा केक तयार करू शकता. लहान मुलांना तर हा केक खूप आवडेल.
साहित्य :
- ऑरीओ बिसकिट – 1 पॅकेट
- दूध – २५० मिलि (गरम दूध )
- १/४ बेकिंग सोडा
- चॉकलेट तुकडे
कृती :
- मिक्सर मध्ये बिसकिटची बारीक पाऊडर करून घ्या.
- एक पातेल्या मध्ये बिसकिट पाऊडर लागेल तसे दूध टाकून मिश्रण फेटून घ्या या त्यामध्ये बेकिंग सोडा टाका.
- अप्पे पात्र घ्या व त्याला तूप लावून त्यामध्ये हे बॅटर टाका.
- आधी थोडे बॅटर टाका व त्यात एक चॉकलेटचे तुकडे टाका व वरुण परत थोडे बॅटर टाका.
- बारीक आचे वर ४-५ मिनीट शिजवून घ्या.
कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणार हा चोको लावा मिनी केक तुम्हाला व घरातील संगळ्यानं नक्कीच आवडेल.