रेसिपीज (पाककृती)

चीझ वडापाव

वडापाव हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळेला खाता येतो. सकाळच्या न्याहारीपासून ते संध्याकाळच्या स्नॅकपर्यंत, वडापाव कधीही आणि कुठेही खाण्यासाठी परिपूर्ण आहे. पण साध्या वडापावला आणखी रुचकर बनवायचं असेल तर त्यात चीजचा वापर करा. चीज वडापावची रेसिपी तितकीच सोपी आहे, पण त्याची चव अप्रतिम आहे. घरातल्या साहित्यांचा वापर करून तयार केलेला हा चीज वडापाव  सर्वांना नक्कीच आवडेल.

Cheese Vadapav

साहित्य :

  1. वड्यासाठी –
    • बटाटे – 4 -5 उकडलेले
    • बेसन – 1/2 कप
    • आलं लसूण पेस्ट – 1 चमचा
    • मिरची – 2-3 बारीक चिरून
    • हळद, मोहरी, जिरे – 1/2 चमचा
    • कडीपत्ता पाने
    • मीठ
    • तेल – तळण्यासाठी
  2. चटनीसाठी –
    • कोथिंबीर – 1/2 कप
    • खोबरे – 1/2 कप
    • मिरची – 2 – 3
    • लिंबाचा रस – 1 चमचा
    • लसूण पाकळी
    • मीठ
  3. पाव
  4. चीझ स्लाइस
  5. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर

कृती :

  1. वडा बनवण्यासाठी –
    • बटाटे उकडलेले स्मॅश करुन घ्या.
    • कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, आले – लसूण पेस्ट, हळद, हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या.
    • यात स्मॅश केलेले बटाटे टाकून मीठ टाकून 2 मिनिटे चांगले परतून घ्या. हे मिश्रण थंड होऊ द्या.
    • आत्ता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
    • बेसन, मीठ आणि पाणी टाकून घट्ट मिश्रण तयार करा.
    • बटाट्याचे गोळे बेसनाच्या पिठात बुडवून तळून घ्या.
  2. चटणी बनवण्यासाठी –
    • मिक्सरमध्ये कोथिंबीर, ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण, लिंबाचा रस, आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या.
  3. वडापाव तयार करण्यासाठी –
    • पावाचे दोन भाग करून घ्या.
    • एका भागावर चटणी लावा.
    • वड्यावर एक चीझ स्लाइस ठेवा.
    • पावाच्या दुसऱ्या भागावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाका
  4. ताजे आणि गरम गरम चीझ वडापाव सर्व्ह करा.

Sayali Kekarjawalekar

Share
Published by
Sayali Kekarjawalekar

Recent Posts

संघर्षाची वाटचाल – रवीच्या जिद्दीने लिहिलेली यशाची कहाणी

ही गोष्ट आहे रवी नावाच्या एका तरुणाची, जो एका मध्यमवर्गीय घरात वाढला होता. रवीची स्वप्नं…

3 महिने ago

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा हा महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट असा पारंपारिक पदार्थ…

3 महिने ago

फ्रेंच फ्राईज 🍟

फ्रेंच फ्राईज हा एक लोकप्रिय आणि चविष्ट स्नॅक आहे जो जगभरात आवडीने खाल्ला जातो. कुरकुरीत…

5 महिने ago

पोटॅटो चीझ नगेट्स

पोटॅटो चीज नगेट्स हा एक लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा  पदार्थ आहे. पोटॅटो…

6 महिने ago

घरच्या घरी बनवा मलाईदार लस्सी फक्त 10 मिनिटांत

वाढत्या तापमानामुळे असह्य वाटतेय का? तर मग आज घेवून आलोय तुमच्यासाठी खास पंजाबची प्रसिद्ध लस्सी…

7 महिने ago

खोबऱ्याची वडी

खोबऱ्याची वडी आपल्या सर्वांच्याच लाडक्या मिठाईंपैकी एक आहे. नैवेद्य आणि सण-समारंभांसाठीही आवर्जून केली जाते. बाजारातील…

7 महिने ago