सकाळच्या घाईत आरोग्यदायी आणि सोपा नाश्ता शोधताय? बेसन चिल्ला हा कमीत कमी वेळात बनणारा आणि अत्यंत पौष्टिक पर्याय आहे. कमी तेलात तयार होणारा हा चिल्ला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग, ह्या सोप्या रेसिपीकडे वळूया.

साहित्य :
- बेसन– १ कप
- कांदा – १ मध्यम आकाराचा, बारीक चिरलेला
- टोमॅटो – १ लहान, बारीक चिरलेला
- हिरवी मिरची – १, बारीक चिरलेली
- आल्याचा किस – १/२ टीस्पून
- कोथिंबीर – २ टेबलस्पून, बारीक चिरलेली
- हळद – १/४ टीस्पून
- लाल तिखट – १/२ टीस्पून
- जीरं – १/२ टीस्पून
- हिंग – एक चिमूटभर
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- तेल/तूप
कृती :
- एका भांड्यात बेसन घ्या आणि त्यात हळद, लाल तिखट, जीरं, हिंग आणि मीठ घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आल्याचा किस आणि कोथिंबीर टाका. सगळं मिश्रण छान एकत्र करा.
- हळूहळू पाणी घालत मिक्स करत राहा आणि गाठी न राहतील याची काळजी घ्या. मध्यमसर, डोशाच्या बॅटरसारखे मिश्रण तयार करा.
- तवा गरम करून त्यावर थोडं तेल पसरवा. मग चमच्याने बॅटर तव्यावर टाका आणि हलक्या हाताने गोलसर पसरा. झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवा. नंतर उलटा करून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.
- बेसन चिल्ला प्लेटमध्ये काढून गरमागरम टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
काही उपयुक्त टीप:
- बेसन चिल्ल्याला अधिक कुरकुरीत बनवायचं असेल तर १ टेबलस्पून तांदळाचं पीठ मिसळा.
- चवीनुसार गाजर, फ्लॉवर किंवा पालकसुद्धा घालू शकता.
- तेलाच्या ऐवजी तूप वापरल्यास अधिक हेल्दी आणि चवदार लागतो.
बेसन चिल्ला तयार! गरमागरम चिल्ला चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा आणि घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा स्वाद अनुभववा. अशीच नवीन आणि खास रेसिपी पाहण्यासाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा. लवकरच भेटूया एका नव्या रेसिपीसोबत!