रेसिपीज (पाककृती)

आमरस 🥭

उन्हाळ्याच्या झळझळीत उन्हानंतर थंडगार वाऱ्याची आणि पिकलेल्या आंब्याच्या मनमोहक सुगंधाचा मोह कोणाला नाही होत? आपण आज आंब्याच्या रसाची स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत.

Mango Pulp - आमरस
Mango Pulp – आमरस

साहित्य:

  1. आंबे – ३
  2. पीठी साखर – २ टेबलस्पून
  3. पाणी – १/२ वाटी
  4. तूप (ऑप्शनल)

कृती:

  1. आंबे धुवून सुकवून घ्या
  2. आंब्याची साल काढून कोय बाजूला काढून घ्या
  3. एका भांड्यामध्ये आंब्याचा गर काढून घ्या
  4. हा गर परत मिक्सर च्या भांड्यात काढून त्यामधे साखर व पाणी घालून फिरवून घ्या
  5. अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यामधे तूप टाका व मिक्स करून घ्या
  6. आंब्याच्या तुकड्यांनी सजवून घेवू शकता.

टीप:

  1. आमरस काळा पडू नये म्हणून त्यामधे लिंबाच्या रसाचे थोडे थेंब घालू शकता.

आशा आहे ही रेसिपी तुम्हाला स्वादिष्ट आणि पारंपारिक आमरस बनवण्यास मदत करेल!

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

संघर्षाची वाटचाल – रवीच्या जिद्दीने लिहिलेली यशाची कहाणी

ही गोष्ट आहे रवी नावाच्या एका तरुणाची, जो एका मध्यमवर्गीय घरात वाढला होता. रवीची स्वप्नं…

3 महिने ago

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा हा महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट असा पारंपारिक पदार्थ…

3 महिने ago

फ्रेंच फ्राईज 🍟

फ्रेंच फ्राईज हा एक लोकप्रिय आणि चविष्ट स्नॅक आहे जो जगभरात आवडीने खाल्ला जातो. कुरकुरीत…

5 महिने ago

चीझ वडापाव

वडापाव हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळेला खाता येतो. सकाळच्या न्याहारीपासून ते संध्याकाळच्या…

6 महिने ago

पोटॅटो चीझ नगेट्स

पोटॅटो चीज नगेट्स हा एक लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा  पदार्थ आहे. पोटॅटो…

6 महिने ago

घरच्या घरी बनवा मलाईदार लस्सी फक्त 10 मिनिटांत

वाढत्या तापमानामुळे असह्य वाटतेय का? तर मग आज घेवून आलोय तुमच्यासाठी खास पंजाबची प्रसिद्ध लस्सी…

7 महिने ago