उन्हाळ्याच्या झळझळीत उन्हानंतर थंडगार वाऱ्याची आणि पिकलेल्या आंब्याच्या मनमोहक सुगंधाचा मोह कोणाला नाही होत? आपण आज आंब्याच्या रसाची स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत.

Mango Pulp - आमरस
Mango Pulp – आमरस

साहित्य:

  1. आंबे – ३
  2. पीठी साखर – २ टेबलस्पून
  3. पाणी – १/२ वाटी
  4. तूप (ऑप्शनल)

कृती:

  1. आंबे धुवून सुकवून घ्या
  2. आंब्याची साल काढून कोय बाजूला काढून घ्या
  3. एका भांड्यामध्ये आंब्याचा गर काढून घ्या
  4. हा गर परत मिक्सर च्या भांड्यात काढून त्यामधे साखर व पाणी घालून फिरवून घ्या
  5. अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यामधे तूप टाका व मिक्स करून घ्या
  6. आंब्याच्या तुकड्यांनी सजवून घेवू शकता.

टीप:

  1. आमरस काळा पडू नये म्हणून त्यामधे लिंबाच्या रसाचे थोडे थेंब घालू शकता.

आशा आहे ही रेसिपी तुम्हाला स्वादिष्ट आणि पारंपारिक आमरस बनवण्यास मदत करेल!

Sayali Kekarjawalekar
Sayali Kekarjawalekar
Articles: 12

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत