ब्लॉग

बिनधास्त मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे!

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

आम्ही, सचिन आणि सायली, आपल्या सर्वांचे बिनधास्त मराठी जगा बिनधास्त ब्लॉगवर स्वागत करतो.

या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अनेक गोष्टींबद्दल सांगू इच्छितो. जसे की –

  • भारतीय परंपरा: आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या वेगवेगळ्या सणांबद्दल माहिती, त्यांचं महत्त्व, आणि ते साजरे करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती देऊ. तसेच आपल्या पुराणकथा आणि इतिहासातील रोचक कथा तुमच्यासोबत शेअर करू.
  • फॅशनची धून: फॅशन ही फक्त कपडे व मेकअप शी संबधित नसते, तर आपल्या स्वतःच्या वेगळ्या शैलीचं प्रदर्शन असते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन ट्रेंड्सबद्दल, वेगवेगळ्या प्रसंगांसाठी योग्य कपडे कसे निवडायचे याबद्दल माहिती देऊ.
  • स्वादिष्ट रेसिपीज: आम्हाला दोघांनाही स्वयंपाक करायला आणि वेगवेगळ्या रेसिपीजचा प्रयोग करायला खूप आवडतं. म्हणूनच आम्ही आपल्या पारंपारिक पाककृत्यांपासून नवीन फ्युजन रेसिपीपर्यंत सर्व काही तुमच्यासोबत शेअर करू.
  • प्रवासाची मस्ती: आपल्या मनाला ऊर्जित करणारा प्रवास हा आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. आमच्या प्रवासातील अनुभवांसह वेगवेगळ्या ठिकाणांबद्दलची माहिती, तिथल्या राहण्याची व्यवस्था, आणि प्रवासाठी उपयुक्त टिप्स तुमच्यासोबत शेअर करू.
  • टेक्नोलॉजी: आजच्या वेगवान जगात आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान खूप महत्वाची भूमिका बजावते आहे. आपण मिळून नवीन तंत्रज्ञानाबद्दल चर्चा करू.

हे फक्त काही विषय आहेत. तुमच्या आवडीनुसार आम्ही अनेक नवीन विषयांवर लिहत जाऊ. तुमच्या सूचना आणि अभिप्रायांचं आम्हाला नेहमी स्वागत आहे. म्हणून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा.

चला तर मग, या बिनधास्त मराठी च्या प्रवासाला आपण सर्वांनी एकत्र येऊया. आणी तुमच्या पाठिंब्याने हा ब्लॉग ज्ञान आणि अनुभवांचं सुंदर संगम बनवूया.

धन्यवाद!
सचिन आणि सायली

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

संघर्षाची वाटचाल – रवीच्या जिद्दीने लिहिलेली यशाची कहाणी

ही गोष्ट आहे रवी नावाच्या एका तरुणाची, जो एका मध्यमवर्गीय घरात वाढला होता. रवीची स्वप्नं…

3 महिने ago

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा हा महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट असा पारंपारिक पदार्थ…

3 महिने ago

फ्रेंच फ्राईज 🍟

फ्रेंच फ्राईज हा एक लोकप्रिय आणि चविष्ट स्नॅक आहे जो जगभरात आवडीने खाल्ला जातो. कुरकुरीत…

5 महिने ago

चीझ वडापाव

वडापाव हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळेला खाता येतो. सकाळच्या न्याहारीपासून ते संध्याकाळच्या…

6 महिने ago

पोटॅटो चीझ नगेट्स

पोटॅटो चीज नगेट्स हा एक लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा  पदार्थ आहे. पोटॅटो…

6 महिने ago

घरच्या घरी बनवा मलाईदार लस्सी फक्त 10 मिनिटांत

वाढत्या तापमानामुळे असह्य वाटतेय का? तर मग आज घेवून आलोय तुमच्यासाठी खास पंजाबची प्रसिद्ध लस्सी…

7 महिने ago