फ्रेंच फ्राईज 🍟

फ्रेंच फ्राईज हा एक लोकप्रिय आणि चविष्ट स्नॅक आहे जो जगभरात आवडीने खाल्ला जातो. कुरकुरीत बटाट्याचे हे काप विविध डिप्स आणि सॉससोबत खाण्यासाठी उत्तम असतात. घरी फ्रेंच फ्राईज बनवणे अगदी सोपे आहे आणि त्यासाठी कमी साहित्याची आवश्यकता आहे.  घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते पाहूया.

French Fries
French Fries

साहित्य :

  1. बटाटे – 4
  2. तेल
  3. मीठ
  4. तिखट
  5. पेरीपेरी मसाला
  6. कॉर्नफ्लॉवर
  7. काळेमिरे पावडर

कृती :

  1. बटाटे सोलून चौकोनी आकारात लांबट कापून घ्या.
  2. हे काप उकडवून घ्या.
  3. नंतर ते एका कपड्यावर टाकून कोरडी करून घ्या.
  4. काप कोरडे झाल्यावर त्यावर कॉर्नफ्लॉवर टाकून आधी कमी आचेवर 10 मिनिटे तळून घ्या.
  5. नंतर ते बाहेर काढून रूम टेंम्प्रेचर वर येवू द्या परत नंतर 3 मिनिटे मध्यम आचेवर तळून घ्या.
  6. एका बाउल मध्ये तिखट, काळीमिरी पावडर, पेरीपेरी मसाला, मीठ मिक्स करून ते फ्राईज वर टाका.
  7. गरमागरम फ्राईज सॉस सोबत सर्व्ह करा

टीप: 

  • कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचे पीठ पण वापरू शकता.
  • आपल्या आवडीनुसार चीज किंवा इतर डिप्स मध्ये बुडवून खावू शकता.
Sayali Kekarjawalekar
Sayali Kekarjawalekar
Articles: 12

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत