पोटॅटो चीझ नगेट्स

पोटॅटो चीज नगेट्स हा एक लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा  पदार्थ आहे. पोटॅटो चीजचे खुसखुशीत आणि चविष्ट नगेट्स घरी तयार करणे खूप सोपे आहे आणि ते कुठल्याही पार्टीत  स्टार्टर किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला एक उत्कृष्ट पर्याय असू शकतात. चला तर मग, आज आपण या स्वादिष्ट पोटॅटो चीज नगेट्सची रेसिपी शिकूया.

Potato Cheese Nuggets

साहित्य :

  1. चीझ – 200 ग्रॅम (खीसलेले)
  2. बटाटे – 2 मोठे उकडून किसून घेतलेले
  3. ब्रेडक्रम्ब्स – 1 कप
  4. चिली फ्लेक्स – 1 चमचा
  5. कॉर्नफ्लॉवर – 1/2
  6. काळीमिरी पूड – 2 चमचे
  7. लाल तिखट – 2 चमचे
  8. ओरेगेणो – 1 चमचा (ऑप्शनल)
  9. मीठ – चवीनुसार
  10. तेल

कृती :

  • एका मोठ्या बाउल मध्ये किसलेले बटाटे, चीज, कॉर्नफ्लॉवर, ओरेगानो, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, गरम मसाला आणि मीठ एकत्र करा
  • तयार मिक्चरचे छोटे छोटे गोळे तयार करा.
  • कॉर्नफ्लॉवर व पाणी मिक्स करून पातळ स्लरी तयार करा.
  • तयार नग्गेट्स स्लरी मध्ये बुडवून नंतर ब्रेडक्रम्ब्स मध्ये घोळवा ज्यामुळे ते खुसखुशीत होतील.
  • कढईत तेल गरम करून त्यामधे नग्गेट्स तळून घ्या जोपर्यंत ते सोनेरी रंगाचे होतील.
  • गरमागरम नग्गेट्स टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
Sayali Kekarjawalekar
Sayali Kekarjawalekar
Articles: 12

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत