वाढत्या तापमानामुळे असह्य वाटतेय का? तर मग आज घेवून आलोय तुमच्यासाठी खास पंजाबची प्रसिद्ध लस्सी रेसिपी.
साहित्य:
- दही : 1 किलो
- साखर : 300 ग्रॅम
- इलायची पावडर : 1/4 चमचा
कृती :
- दह्यामध्ये साखर मिक्स करून घ्या व त्यामध्ये इलायची पावडर मिक्स करा
- 5 – 6 मिनिटे चांगले फेटून घ्या.
- आपली लस्सी तयार आहे. आत्ता तयार लस्सी फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवून द्या
टिप्स :
- दही मध्ये पाणी मिक्स करू नका.
- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्ड लस्सी सुद्धा बनवू शकता जसे की,
- मँगो फ्लेवर – आंब्याचा रस टाकून बनवू शकता.
- केशर लस्सी – केशर पाण्यामधे भिजवून टाकून बनवू शकता
- चॉकलेट फ्लेवर – कोको पावडर मिक्स करून बनवू शकता
- ड्रायफ्रूट्स व चेरी टाकून डेकोरेट करू शकता.