खोबऱ्याची वडी आपल्या सर्वांच्याच लाडक्या मिठाईंपैकी एक आहे. नैवेद्य आणि सण-समारंभांसाठीही आवर्जून केली जाते. बाजारातील मिठाईंपेक्षा घरात बनवलेली खोबऱ्याची वडी जास्त स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी थोड्या वेळात खोबऱ्याची वडी कशी करायची ते पाहणार आहोत.
साहित्य :
- खोबरं – 1 कप खिसलेले
- साखर – ½ कप
- दूध – ¼ कप
- तूप – 2 चमचे
- इलायची पूड – ½ चमचा
- काजू
- बदाम
कृती :
- एका कढई मध्ये तूप गरम करा. त्यात खोबऱ्याचा खीस घालून मंद आचेवर परतून घ्या
- साखर आणि दूध घालून साखर विरघळेपर्यंत शिजवा.
- इलायची पावडर घाला आणि मिक्स करून घ्या.
- एका ताटात काढून घ्या व पसरवून घ्या व वड्या पाडून घ्या.
- काजू, बदाम, सुकामेवा टाकून सजवून घ्या.
टिप्स :
- वडी चांगली कोरडी होण्यासाठी वेळ लागेल.
- काजू, बदाम व सुकामेवा पर्यायी आहे.