पाव भाजी ही एक लोकप्रिय भारतीय डिश आहे जी मुंबईच्या स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे. ती बनवणे सोपे आहे आणि चवीला खूपच सुंदर आहे.
साहित्य :
- कांदा – २ (१ मिक्सर मधून पेस्ट केलाला, १ बारीक चिरलेला)
- टोमॅटो – ३ (१ मिक्सर मध्ये पेस्ट केलेला, २ बारीक चिरलेले)
- हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेली)
- गाजर – ½ कप
- बटाटे – २ उकडून स्मॅश करून घ्या
- वाटाणे
- आले लसूण पेस्ट – १ चमचा
- धने पूड – १ चमचा
- हळद – ½ चमचा
- लाल तिखट – १ चमचा
- पावभाजी मसाला – १ चमचा
- तेल – २ टेबलस्पून
- बटर -½ चमचा
- कोथिंबीर
- मीठ – चवीप्रमाणे
- पाव
- चीझ
कृती :
- एका मोठ्या कढईमध्ये तेल आणि तूप गरम करा. त्यात मिक्सर पेस्ट काढलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या.
- टोमॅटो पेस्ट, आले-लसूण पेस्ट, धणेपूड, वाटाणे, गाजर, लाल तिखट आणि पाव भाजी मसाला घाला आणि मसाले २ मिनिटे परतून घ्या.
- त्यामध्ये १ वाटी पाणी टाका.
- स्मॅश केलेले बटाटे, हळद आणि मीठ घालुन चांगले मिक्स करून घ्या.
- भाजी झाकून ठेवून मऊ होयीपर्यंत शिजवून घ्या.
- भाजीवर चिरलेले कोथिंबीर, टोमॅटो, कांदा व चीझ टाकून डेकोरेट करा व भाजलेल्या पावसोबत गरम गरम सर्व्ह करा.
टिप्स:
- आपल्या आवडीनुसार पाव तुपामध्ये / बटरमध्ये भाजून घेऊ शकता.
- आपल्या आवडीनुसार भाजी मध्ये फुलगोबी, वांगी, ब्रोकली, पनीर बारीक करून टाकू शकता
ही पावभाजी तुमच्या घरातील सर्वांना नक्कीच आवडेल. अधिक स्वादिष्ट रेसिपीसाठी आमच्या ब्लॉगला भेट देत राहा.