सुगंधी दुधाच्या सारात बुडवलेली मऊ रसमलाई. घरी बनवण्यास अगदी सोपा आणि उत्तम मिठाईचा पदार्थ तुमच्या कुटुंबातील सर्वांना नक्कीच आवडेल!
साहित्य :
- दूध – १ लिटर
- लिंबू- १
- मैदा – ½ कप
- कॉर्नफ्लॉवर – १ चमचा
- साखर कप -३ कप
- वेलची पूड
- ड्रायफ्रुट – केशर, बदाम, पिस्ता
कृती :
- सर्वप्रथम, १ लिटर दूध एका पातेल्यात मध्यम आचेवर गरम करून घेणे
- लिंबाच्या रसामध्ये थोड पाणी मिसळून दूध उकळी येण्याच्या थोड आधी दुधामध्ये मिसळा आणी फुटलेले दूध वेगळे करून गाळून घ्या
- गाळलेल्या दुधातून पनीर वेगळे करून थंड पाण्याने धुवून टाका
- मैदा, कॉर्नफ्लोअर, आणी दूध मिक्स करून त्याची एक पेस्ट बनवून पनीर मध्ये टाकून लहान गोळे बनवून घ्या
- पाणी आणी साखर एकत्र करून चाचणी तयार करा, आणि चाचणी थोडी गाढ होईपर्यंत शिजवा
- तयार केलेल्या चाचणी मध्ये पनीर चे गोळे घालून १५ मिनिटे शिजवून घ्या
- दुसऱ्या पातेल्यामध्ये उरलेले दूध गरम करून साखर, आणी केशर टाकून थोडे घट्ट होईपर्यंत उकळून घ्या
- गोळे थंड झाल्यावर दुधामध्ये घालून थोड्या वेळ उकळून घ्या
- बदाम आणी पिस्ता चे तुकडे करून सजवा आणी थंड झाल्यावर सर्व्ह करा
रसमलाई ही एक परंपरागत भारतीय मिठाई आहे जी थोड्या प्रयत्नाने बनवता येते. आमच्या या सोप्या रेसिपीचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात हा स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता आणि तुमच्या प्रिय व्यक्तींना सोबत खाण्याची मजा घेऊ शकता.