उन्हाळ्यात थंडगार आणि ऊर्जा देणारा पेय हवा असेल तर कोल्ड कॉफी हा उत्तम पर्याय आहे. बनवण्यास अतिशय सोपी आणि चवीला स्वादिष्ट असलेली कोल्ड कॉफी घरीच बनवून तुम्ही उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकता. या ब्लॉगमध्ये आपण कोल्ड कॉफी घरी बनवण्याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य :
- दूध – १ कप थंड
- साखर – चवीनुसार
- इन्स्टंट कॉफी पावडर – २ चमचे (ब्रू, नेसले)
- बर्फ – गरजे नुसार
कृती :
- इन्स्टंट कॉफी पावडर आणि साखर थोड्याशा गरम पाण्यात एकत्र करा आणि विरघळवा.
- थंड दूध घ्या आणि त्यात कॉफीचे मिश्रण टाका.
- आता त्यात भरपूर बर्फाचे क्युब्ज घाला आणि मिक्सर मध्ये 2 मिनिट फिरवून घ्या.
- आपल्या आवडीने चॉकलेट सिरप, व्हिप क्रीम किंवा व्हॅनिला आइस्क्रीम याने डेकोरेट करा.
टिप्स :
- कॉफीला फेस येईपर्यंत मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
- आपल्या आवडीनुसार चॉको चिप्स, चॉकलेट क्रश ने गार्निश करू शकता.
- कोल्ड कॉफी बनवण्यासाठी तुम्ही मिक्सरऐवजी ब्लेंडर देखील वापरू शकता.
आशा आहे की तुम्हाला कोल्ड कॉफी बनवण्याची ही रेसिपी आवडली असेल.